new-img

लसणाचे भाव तेजीत, उत्पादक शेतकरी आनंदात

लसणाचे भाव तेजीत, उत्पादक शेतकरी आनंदात

बाजारात लसणाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले. शेतकऱ्यांच्या लसूणला बाजारसमितीत सरासरी दर ३० रूपये प्रतिक्विंटलपर्यंत मिळत आहे. लसणाचे भाव वाढल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा मिळत आहे.बाजारसमितीत सद्यस्थितीत कमी भाव लसणाला मिळत आहे. आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात लसणाला मागणी वाढली आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत सरासरी २८ हजार रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत ९०९ क्विंटल लसणाची आवक झाली आहे. सातारा बाजारसमितीत लसणाला २० हजार रूपये भाव मिळाला असुन या बाजारसमितीत २४ क्विंटल आवक झाली आहे. सोलापूर बाजारसमितीत लसणाला २८३०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत ६९ क्विंटल आवक झाली आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर २३ हजार ते जास्तीतजास्त दर ३५००० रूपये भाव मिळाला आहे. 
बाजारसमितीत लसणाला चांगला भाव मिळत असुन बाजारअभ्यासकांच्या पुढेही दर तेजीत राहू शकतात. असा अभ्यासकांनी अंदाज वर्तवला आहे.