new-img

फळबागेत फुल आंतरपीक घेताना घ्या काळजी..

फळबागेत फुल आंतरपीक घेतांना घ्या काळजी

https://youtube.com/shorts/UfT79CCPoI4

फळबागेत फुल आंतरपीक घेण्याचा तुमचा विचार आहे का? आंबा, चिकू, सिताफळ, द्राक्ष, संत्रा आणि डाळिंब सारख्या फळबागेत झाडांचे अंतर जास्त असते त्यामुळे फुल पिकाची लागवड तुम्ही करु शकता. पण काही गोष्टींची काळजी ही तुम्ही घ्यायला हवी. सर्वात महत्वाचे म्हणजे जेव्हा तुम्ही फुल पिकांची आंतरपीक म्हणून लागवड कराल तेव्हा मुख्य पीक व आंतरपीक यांचा वाढीचा कालावधी नेमका किती आहे, याचा अभ्यास करूनच निवड करणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही फळबागेत फुलांच्या आंतरपीक म्हणून लागवड कराल तेव्हा फळांचा हंगाम लक्षात घेऊनच लागवड करणे गरजेचे आहे. या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही फळबागेत फुल आंतरपीक घेतांना काळजी घेऊ शकता.