new-img

कांद्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव?

कांद्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव? 
कांदा बाजारभाव २७-११-२४
मुंबई-  ४२०० रू
अमरावती- ३००० रू
पुणे- ४४०० रू
पिंपळगाव बसवंत- ५७०० रू

शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारात सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. बाजासमितीत कांद्याला सरासरी ५७०० रूपये भाव मिळत आहे. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार २७ नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव ४२०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याची आवक १०१३२ क्विंटल झालेली आहे. या दिवशी पुणे कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सरासरी भाव हा ४४०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याची आवक ११११३ क्विंटल झालेली आहे. अमरावती बाजारसमितीत कांद्याला सरासरी ३००० रूपये भाव मिळाला आहे. या दिवशी या बाजारसमितीत फक्त २२३ क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. 
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजारसमितीत उन्हाळी कांद्याला सरासरी भाव हा ५७०० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत कांद्याची ५२५ क्विंटल आवक झाली आहे. या बाजारसमितीत कांद्याला कमीतकमी भाव ३५०० जास्तीतजास्त भाव हा ६५०० ते सरासरी भाव हा ५७०० रूपये मिळाला आहे. बाजारात उन्हाळी कांद्याला सध्या समाधानकारक भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आनंदात आहेत.