new-img

तुरीच्या दरात घसरण

तुरीच्या दरात घसरण

बाजारसमितीत तुरीची आवक कमी झाली आहे. शेतकऱ्यांच्या तुरीलाही बाजारात कमी भाव मिळत आहे. महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत तुरीला सरासरी ८ हजार रूपये भाव मिळत आहे. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी  नागपूर बाजारात शेतकऱ्यांच्या तुरीला सरासरी ७९५० रूपये भाव मिळत आहे. या बाजारसमितीत कमीतकमी दर हा ७५०० ते जास्तीतजास्त दर हा ८१०० रूपये भाव मिळत आहे.  या बाजारसमितीत ३ क्विंटल तुरीची आवक झाली आहे. १९ नोव्हेंबर २०२४ लातूर बाजारसमितीत सरासरी दर हा ९४०५ रूपये भाव मिळाला आहे. लातूर बाजारसमितीत तुरीला कमीतकमी दर हा ९१०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत जास्तीतजास्त दर हा ११५०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारसमितीत १२०  क्विंटल तुरीची आवक झाली आहे. वाशिम बाजारसमितीत या दिवशी कमीतकमी दर ९५८० रूपये भाव मिळाला असुन जास्तीतजास्त भाव १०४८० रूपये मिळाला आहे. या बाजारसमितीत सरासरी दर हा ९८५० रूपये भाव मिळाला आहे. बाजारसमितीत तुरीला कमी दर मिळत असुन अजुन काही दिवस दरात चढउतार राहण्याची शक्यता आहे.