new-img

परसामागील कुक्कुटपालन असे करा, मिळणार दुप्पट नफा

परसामागील कुक्कुटपालन असे करा, मिळणार दुप्पट नफा

https://youtube.com/shorts/feTgkODCius

परसामागील कुकुटपालन सुरू करण्याचा विचार तुम्ही करत असाल तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत न चुकता पहा. परसातील कुक्कुटपालनात खाद्यावर फारसा खर्च होत नाही. परसातील कुक्कुटपालनातून व्यवसायिक मोठा नफा मिळवू शकतात. परसातील कुक्कुटपालनात येणाऱ्या कोंबड्या तयार होण्यास जास्त वेळ लागत नाही. स्थानिक जातीच्या कोंबड्या ७ ते ८ महिन्यांत तयार होतात, तर सुधारित जातीच्या कोंबड्यांचे वजन ४ ते ५ महिन्यांत सुमारे एक ते दीड किलोपर्यंत पोहोचते. जर तुम्ही मोठ्या संख्येने कोंबड्या पाळल्या तर त्यांच्याकडून तुम्हाला दरवर्षी लाखोंचा नफा मिळू शकतो. याशिवाय देशी जातीच्या कोंबड्यांच्या मांसाला बाजारात जास्त मागणी आहे, त्यांचे मांस विकूनही तुम्ही चांगला नफा कमवू शकता.