शेतकऱ्यांना विनातारण दोन लाखाचं कर्ज मिळणार
- By - Team Agricola
- Dec 21,2024
शेतकऱ्यांना विनातारण दोन लाखाचं कर्ज मिळणार
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने ०६ डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला. आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याविषयीची घोषणा केली. वाढत्या महागाईत शेतकऱ्यांना मदतीसाठी आता विना तारण दोन लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या शेतकर्यांना विना तारण १.६ लाखांचे कर्ज देण्यात येते. आता ही मर्यादा दोन लाख रुपये करण्यात आली आहे. आरबीआयने २०१० मध्ये कृषी क्षेत्रात विना तारण एक लाख रुपये कर्ज देण्याची मर्यादा निश्चित केली होती. २०१९ मध्ये ही मर्यादा १.६ लाख रुपये करण्यात आली. आता त्यात अजून ४० हजारांची वाढ करण्यात आली आहे.