जमिन मोजणीच्या फि मधील बदल.
- By - Team Bantosh
- Dec 20,2024
जमिन मोजणीच्या फि मधील बदल.
https://youtube.com/shorts/fTS_zFkmllg
जमिन मोजणीची फि किती आहे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा. जमिनी मोजणीचे नियमित मोजणी आणि द्रूतगती मोजणी असे दोन प्रकार पडले आहेत. ‘नियमित मोजणी’ ९० दिवसांत पूर्ण करण्याचं बंधन असेल. नियमित मोजणीसाठी २ हेक्टरच्या मर्यादेपर्यंत २ हजार रुपये फी असेल आणि २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी १ हजार रुपये फी आकारली जाणार आहे. द्रूतगती मोजणी ३० दिवसांच्या आत पूर्ण करण्याचं बंधन आहे. द्रूतगती मोजणीसाठी २ हेक्टर मर्यादेपर्यंत ८ हजार रुपये फी असेल. २ हेक्टरच्या पुढे प्रती २ हेक्टरसाठी ४ हजार रुपये फी आकारली जाईल.