माती परिक्षणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा.
- By - Team Agricola
- Dec 18,2024
माती परिक्षणामुळे शेतकऱ्यांना होणार फायदा.
https://youtube.com/shorts/0FKRW9_8TEA
तुम्ही तुमच्या मातीचे परिक्षण केले आहे का नसेल केले तर करायलाच हवे पण कसे तर ते ही सांगते. माती परिक्षण केल्यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांच्या आधारावर पिकाला योग्य वेळी योग्य प्रमाणात रासायनिक खत देणं सोपं होतं त्यामुळे अनावश्यक खताचा वापर कमी होऊन खर्चाच्या खर्चात बचत होते. जमिनीची नेमकी सुपीकता, उपलब्ध असलेले जमिनीतील क्षार, सेंद्रिय कर्ब सामू इत्यादी बाबींची माहिती मिळते त्यामुळे जमिनीची नेमकी सुपीकता टिकून ठेवण्यासाठी नियोजन करता येते. माती परीक्षणाच्या आधारावर खताचे व्यवस्थापन झाल्यामुळे खताच्या मात्रेत बचत होते उत्पादन खर्चात कपात होते. जमिनीतील काही घटकांच्या उपलब्धतेनुसार / माती परीक्षण अहवालाच्या आधारावर पिकाचे योग्य नियोजन करता येते उदाहरणार्थ संत्रा वर्गीय पिकात 10 टक्केच्या वर चुनखडीचे प्रमाण जमिनीत आढळल्यास अशा जमिनीत संत्रा वर्गीय पिके घेणे टाळावे असा सल्ला दिला जातो व पर्यायी पिकाचा सल्ला दिला जातो.