new-img

पपई फळबागेला रोगापासून करावे संरक्षण

पपई फळबागेला रोगापासून करावे संरक्षण

https://youtube.com/shorts/AGMLQIBYBx8

आपण पपईचा विचार केला आहे का? तर यामध्ये मूळ आणि खोड कुजणे हाय प्रमुख रोग आहे. या रोगामध्ये मुळे किंवा देठ कुजल्याने झाड मरते. या रोगाचे पहिले लक्षण म्हणजे देठावर काही ठिपके दिसून येतात व त्यानंतर वाढतात व पूर्ण देठा भोवती पसरतात. त्यामुळे वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे. ज्या जमिनीत पाणी साचत असेल अशा ठिकाणी पपईची लागवड करू नये. पाण्याचा योग्य निचरा होईल अशी व्यवस्था पपई बागेत करावी. देठावर ठिपके दिसल्यास, रिडोमिल( मेटालोक्सिल) किंवा मॅन्कोझेब दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात द्रावण तयार करून रोपांच्या देठाजवळील पाच सेंटीमीटर खोलीचे माती काढून चांगले पाणी द्यावे. रोगग्रस्त झाडे उपटून टाकावेत आणि जमिनीत गाडून टाका किंवा शेताबाहेर काढून जाळून टाकावे. झाडाच्या सभोवतालची माती एक टक्के बोर्डो मिश्रणाने प्रक्रिया करून पाणी द्यावे.