जाणून घ्या, द्राक्ष बाग लागवड
- By - Team Agricola
- Dec 15,2024
जाणून घ्या, द्राक्ष बाग लागवड
https://youtube.com/shorts/0cv0wA7VcCk
द्राक्ष बाग लागवड करण्याचा विचार असेल तर काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळणे फार गरजेचे आहे. द्राक्ष बाग लागवड करण्याआधी आपली एकूण जमीन किती आहे? ती बागायत आहे का? इत्यादी गोष्टींचा विचार करणे खूप गरजेचे आहे.बऱ्याचदा जमिन एका ठिकाणी नसते तर ते दोन ते तीन ठिकाणी असते तर अशावेळी एकाच कुठल्यातरी ठिकाणांची निवड करा. जमिनीची निवड करताना त्या जमिनीचे क्षेत्र, या जमिनीचा सुपीकता व त्या जमिनीला असलेल्या पाणीपुरवठा साधनांची सोय व वाहतुकीसाठी रस्ता इत्यादी बाबींचा विचार करणे खूप गरजेचे आहे. ऑक्टोबर ते जानेवारीच्या मध्यात तुम्ही लागवड करू शकतात. जर तुम्ही डिसेंबर, जानेवारीत लागवड केली तर अधिक यशस्वी होते व पहिले पीक १५ महिन्याच्या आत हातात देऊ शकते. द्राक्षांची लागवड करताना दोन ओळीत आठ फूट व दोन वेलीत सहा फूट अंतर असणे गरजेचे आहे. रूट स्टॉक वापरायचा असेल तर दोन ओळींत बारा फूट आणि दोन वेलीत ८ फूट अंतर ठेवावे.