new-img

द्राक्ष लागवडीची निवड ठरणार फायदेशीर

द्राक्ष लागवडीची निवड ठरणार फायदेशीर

https://youtube.com/shorts/2P9RBKD-2Ds

द्राक्ष बागेची लागवड करून शेतकरी चांगला नफा कमवू शकता. फळबागेचा विचार करत असताल तर तुम्ही देखील द्राक्ष बागेचा विचार करायला हवा. पण द्राक्षबागेचाच का दुसरा का नाही हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर सांगते. तुम्ही द्राक्षबागांचे लागवड केली तर पहिले पीक साधारणतः दीड वर्षात हातात येते. एकदा द्राक्षाची लागवड केली तर कमीत कमी दहा वर्षापर्यंत एक चांगला आर्थिक उत्पन्नाचा स्त्रोत मिळणे शक्य आहे. द्राक्ष बागेत वर्षभर वेगवेगळ्या पद्धतीचे कामे असतात त्यामुळे मजुरांच्या हाताला देखील वर्षभर काम उपलब्ध होते. आपल्या जवळ उपलब्ध असलेले पाणी, जमीन आणि मनुष्यबळ यांचा चांगल्या पद्धतीने मेळ घालता येतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे द्राक्षबाग हे एक प्रतिष्ठितपणाचे तसेच अभ्यासूपणाचे द्योतक आहे. या सर्व फायद्यांमुळे द्राक्ष बागेची लागवड तुम्ही करायलाच हवी.