new-img

शेतकऱ्यांनो रब्बी पीक विमा भरा, १५ डिसेंबर अखेर मुदत

शेतकऱ्यांनो रब्बी पीक विमा भरा, १५ डिसेंबर अखेर मुदत

खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामातही शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळणार आहे. रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी पिकांसाठी प्रधानमंत्री विमा योजनेतंर्गत १ रुपयात पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी व शेतक-यांना ऑनलाईन पिक विमा भरण्यासाठी दि. १५ डिसेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. या योजनेसाठी केवळ २ दिवस शिल्लक राहिले आहेत. ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपला विमा भरला नाही त्यांना या योजनेपासून वंचिर रहावे लागू शकते तर त्या शेतकऱ्यांनी त्वरित विमा भरून घ्यावा आणि सरकारच्या पिक विमा योजनेचा लाभ घ्यावा.