new-img

सावधान! फळमाशी करणार फळ बागेचे नुकसान

सावधान! फळमाशी करणार फळ बागेचे नुकसान

https://youtube.com/shorts/xmn42ZjJsgk

तुम्ही तुमच्या शेतात फळबाग लावली आहे का? काही गोष्टींची काळजी ही तुम्ही घ्यायलाच हवी. कारण शेतकऱ्यांनो तुम्हाला फळबागांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न हवे असेल तर सर्व बाजूंनी व्यवस्थापन व्यवस्थित असणे गरजेचे आहे. यामध्ये कीड व्यवस्थापनाला खूप मोठे महत्त्व आहे. फळबागावर फळमाशीचा प्रादर्भाव तुमच्या पिकासाठी धोकादायक ठरू शकतो. या माशीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे फळमाशीची एक मादी संपूर्ण जीवन काळात फळाच्या सालीखाली ५०० ते १०० अंडीपुंजके देते. त्यामधून चार ते पाच दिवसात किंवा सात दिवसात अळ्या बाहेर पडतात. या बाहेर पडलेल्या अळ्या फळांच्या गरावर उपजीविका करतात व फळे कुजवतात. या अळीच्या प्रादुर्भावामुळे फळांना अकाली पक्वता येते तसेच फळांमध्ये अळ्या पडतात असे फळे वेडीवाकडी होतात व फळगळ होते.