new-img

आंबिया बहार घेण्याकरिता खताचे नियोजन

आंबिया बहार घेण्याकरिता खताचे नियोजन

https://youtube.com/shorts/r3MdcuQB_qA

संत्रा, मोसंबी बागेचे आंबिय बहार घेण्याकरीता खताचे नियोजन कसे असावे ते आज या व्हिडीओतून पाहूयात. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून ताणावर सोडल्यानंतर त्वरीत प्रत्येक झाडाला ४० ते ५० किलो शेणखत टाकून आडवी आणि उभी वखरण करावी. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा तापमान वाढताच हलके ओलित करावे. ताण तोडतांना हलक्‍या ओलिताअगोदर प्रत्येक झाडाला ६०० ग्रॅम नत्र + ४०० ग्रॅम स्फुरद + ४०० पालाश आणि भरखते द्यावीत, त्यानंतर पाच ते सात दिवसांनी दुसरे पाणी (चिंबवणी) द्यावे. तिसऱ्या पाळीला भरपूर पाणी द्यावे. ताण सोडल्यावर २० ते २५ दिवसांनी फुले येतात. त्यानंतर उरलेल्या नत्राचा (अर्धा) हप्ता एक ते दीड महिन्याने किंवा फळे वाटाण्याएवढी झाल्यावर द्यावा. हलक्‍या जमिनीत नत्राची मात्रा तीन ते चार हप्त्यात विभागून दिल्यास जास्त फायदेशीर ठरते. अशा पद्धतीने शेतकरी आंबिया बहार घेण्याकरीता खताचे नियोजन करून उत्पन्नात वाढ मिळवू शकता.