संत्रा, मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन कसे करावे?
- By - Team Agricola
- Dec 12,2024
संत्रा, मोसंबी बागेचे आंबिया बहार व्यवस्थापन कसे करावे?
https://youtube.com/shorts/vXaiiaPhgs8
थंडी संपतेवेळी येणाऱ्या आंबिया बहाराचे व्यवस्थापन करण्यासाठी बागेची निगा कशी राखावी. हा दर प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडीओ न चुकता शेवटपर्यंत नक्की पहा. आंबिया बहार घेण्याकरिता संत्रा-मोसंबी झाडाला ताण देणे अत्यंत गरजेचे आहे. झाडांना ताण देणे म्हणजे झाडांची सतत होणारी वाढ थांबविण्याकरिता पाण्याचा पुरवठा बंद करणे, म्हणजे संत्रा-मोसंबी झाडाला पाण्याचा ताण दिल्यामुळे झाडांची वाढ थांबते. झाडे विश्रांती घेतात. त्यामुळे झाडाच्या फांद्यांत पानात अन्नद्रव्यांचा संचय होतो. आंबिया बहार घेण्याकरिता डिसेंबर महिन्याचा दुसरा आठवडा ते जानेवारीचा दुसरा आठवडा या कालावधीत संत्रा-मोसंबी बागेचे ओलित बंद केले जाते. या ताणाचा कालावधी जमिनीचा पोत, झाडाचे वय आणि जमिनीमध्ये उपलब्ध असलेला ओलावा यावर अवलंबून आहे. आंबिया बहारासाठी हलक्या जमिनीत ४५ दिवस, मध्यम जमिनीत ४५-६० दिवस आणि भारी जमिनीत ५५ ते ७५ दिवस ताण द्यावा.