new-img

रब्बी ज्वारी पिकासाठी पाणी व्यवस्थापन

रब्बी ज्वारी पिकासाठी पाणी व्यवस्थापन

https://youtube.com/shorts/GLrX2w1w_SQ

तुम्ही तुमच्या शेतात ज्वारी पीक घेतात का? हा व्हिडीओ तुमच्या अत्यंत फायद्याचा ठरणार आहे. रब्बी ज्वारी पीकासाठी पाण्याचे व्यवस्थापन कसे करावे ते सांगते. रब्बी ज्वारीसाठी पहिले पाणी पेरणी नंतर ३० दिवसांनी द्यावे. दुसरे पाणी पेरणीनंतर ५० ते ५५ दिवसांनी द्यावे. तिसरे पाणी ज्वारी फुलोऱ्यात असताना म्हणजे पेरणीनंतर ७५ दिवसांनी द्यावे. चौथे पाणी कणसात दाणे भरताना म्हणजे पेरणीनंतर ९० ते ९५ दिवसांनी द्यावे. समजा रब्बी ज्वारीस एकच पाणी देणे शक्‍य असल्यास, ते पेरणीनंतर २८ ते ३० दिवसांत समजा जमिनीत ओल असल्यास ५० दिवसांत द्यावे. दोन पाणी उपलब्ध असतील तर पहिले पाणी २५ ते ३० दिवसांनी आणि दुसरे पाणी ५० ते ५५ दिवसांनी द्यावे.