new-img

गहू पिकासाठी असे करा पाणी व्यवस्थापन.

गहू पिकासाठी असे करा पाणी व्यवस्थापन

https://youtube.com/shorts/vtuc0TSorhA

रब्बी हंगामात बऱ्याच शेतकऱ्यांनी गहू लागवड केली असेल तर व्हिडीओ तुमच्याासाठी फार महत्वाचा ठरणार आहे. आणि अजुनही केली नसेल तर शेतकऱ्यांनो गव्हाची पेरणी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळया दयाव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी ४ ते ५ वेळा पाणी दयावे लागते. पीक वाढीच्या ज्या महत्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पाणी देणे फायदेशीर ठरते. पाणीपुरवठा अपुरा असल्यास काही ठराविक वेळेलाच पाणी देणे शक्य असेल तर पाण्याच्या पाळया पुढीलप्रमाणे दयाव्यात. नंबर १. गहू पिकास एकच पाणी देणे शक्य असल्यास ते ४० ते ४२ दिवसांनी दयावे. नंबर २. गहू पिकास पेरणीनंतर दोन वेळेस पाणी देणे शक्य असल्यास, पहिले पाणी २० ते २२, दुसरे पाणी ४० ते ४२ व तिसरे पाणी ६० ते ६५ दिवसांनी दयावे.