कांद्यावरील मर रोगावर बेस्ट उपाय.
- By - Team Agricola
- Dec 10,2024
कांद्यावरील मर रोगावर बेस्ट उपाय
https://youtube.com/shorts/cnEneJKXLSk
कांद्यावर हिवाळ्यात धुक्यांमुळे मर रोग्य वाढण्याचे फार मोठे प्रमाण आहे. अशावेळी मर रोगावर वेळीच नियंत्रण करणे गरजेचे आहे. जसे की कांद्याचे बियाणे निरोगी स्वच्छ व खात्रीचे असावे. लागवडीपूर्वी बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी. रोपाची लागवड करताना पाण्याचा निचरा लवकर आणि चांगल्या प्रमाणात होणारी जागा निवडावी. रोपे गादीवाफ्यावर तयार करावे. रोपवाटिकेची जागा प्रत्येक वेळी बदलावी.रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास दोन रोपांच्या ओळीत ताम्रयुक्त बुरशीनाशक पाण्यात मिसळून तयार केलेल्या द्रावणात ओतावे. शेताजवळ, बांधावर पहाटेच्या वेळी मध्यम ओलसर पालापाचोळा, कोरडे तण,सुकलेले लाकूड आधी हवेच्या प्रवाहाच्या उलट दिशेलापेटवून धूर करावा. त्यात दगडी कोळसा टाकून धूर व उष्णता रात्रभर राहील असे पाहावे. संध्याकाळी रोपांच्या पानांवर पाण्याचा हलका फवारा मारावा