new-img

कांद्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव?

कांद्याला बाजारात किती मिळतोय बाजारभाव?

बाजारसमितीत कांद्याला सरासरी समाधानकारक बाजारभाव मिळत आहे. बाजारात शेतकऱ्यांच्या कांद्याला सरासरी ५ हजार रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ९ डिसेंबर २०२४ रोजी पुणे बाजारात सरासरी ४८५० रूपये भाव मिळत असुन या बाजारात कमीतकमी दर २५०० ते जास्तीतजास्त दर ७२०० रूपये मिळत असुन ११६८३ क्विंटल झालेली आहे. पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर ४२५१ रूपये मिळाला असुन कमीतकमी दर ३२०१ जास्तीतजास्त दर ६३५२ मिळाला असुन या बाजारात १५० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीत कांद्याला सरासरी दर ३००० रूपये मिळाला असुन या बाजारात कमीतकमी भाव १००० रूपये जास्तीतजास्त भाव ५००० रूपये मिळाला आहे. या बाजारात १२२५३ क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे. मनमाड बाजारसमितीत कांद्याला ३४०० रूपये भाव मिळाला आहे. या बाजारात ३५०० क्विंटल कांद्याची आवक झालेली आहे.
बाजारात लाल कांद्याची आवक काहीशी वाढलेली असुन उन्हाळी कांद्याची आवक कमी झालेली आहे.