लसणाचे भाव तेजीत, उत्पादक शेतकरी आनंदात
- By - Team Agricola
- Dec 07,2024
लसणाचे भाव तेजीत, उत्पादक शेतकरी आनंदात
बाजारसमितीत लसणाला चांगले भाव मिळत आहे. बाजारात लसणाची आवक कमी झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या लसणाला बाजारात समाधानकारक भाव पाहायला मिळत आहे. बाजारात सरासरी शेतकऱ्यांच्या लसणाला २५ हजार ३० रूपयांपर्यंत भाव मिळत आहे.
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार ०७ डिसेंबर २०२४ रोजी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत लसणाला २८ हजार रूपये भाव मिळाला आहे. या बाजारात कमीतकमी भाव १८००० ते जास्तीतजास्त दर ३२००० रूपये मिळाला असुन सरासरी दर २८००० रूपये मिळाला आहे. ६ डिसेंबर २०२४ रोजी मुंबई बाजारसमितीत २९५०० रूपये भाव मिळाला आहे. सोलापूर बाजारात २८००० रूपये भाव मिळाला आहे.
सध्या बाजारात लसणाला चांगला भाव मिळत असुन अजुन काही दिवस भाव तेजीत राहतील असा बाजारअभ्यासकांचा अंदाज आहे.