कांदा दराबाबतीत सरकारचा प्लॅन यशस्वी ठरेल का?
- By - Team Agricola
- Dec 07,2024
कांदा दराबाबतीत सरकारचा प्लॅन यशस्वी ठरेल का?
गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांपासून ते दिग्गज नेत्यांपर्यंत डोळ्यात पाणी आणणारा आणि चर्चेचा विषय बनणारा आपला कांदा एखाद्या सेलिब्रिटी पेक्षा कमी नाही. लोकसभा निवडणुकीत गाजलेला कांदा प्रश्न हे आपण मुळीच विसरलेलो नाही. तो कांदा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. लोकसभेच्या वेळी भाव घसरले होते पण आता भाव वाढले आहेत आणि यामुळे शेतकरी राजाला मात्र काहीसे समाधान पाहायला मिळालेले आहे. पण शेतकऱ्यांच्या हातात दोन पैसे यायला लागले की सरकारी धोरणामुळे भाव घसरता. आजच्या व्हिडीओमध्ये पाहूयात कांदा पिकाच्या स्थिती संदर्भात विश्लेषन