new-img

लातूर बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी हमीभावापेक्षा कमी दर

लातूर बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी हमीभावापेक्षा कमी दर

गेल्या दोन वर्षापासून बाजारात सोयाबीनला सरासरी हमीभावाइतकाही दर मिळत नसल्याने उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. 
महाराष्ट्र राज्य पणन मंडळाच्या अधिकृत माहितीनुसार बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४३२० रूपयांपर्यंत मिळत आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४३२० रूपये मिळत असुन या बाजारसमितीत सरासरी ३०९८० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. हिंगोली कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४१०० रूपये मिळत असुन या बाजारसमितीत १३०० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. अमरावती बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४०६९ रूपये मिळाला असुन या बाजारसमितीत ७८१२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजारसमितीत सोयाबीनला सरासरी दर ४०२५ रूपये मिळाला असुन या बाजासमितीत सोयाबीनची आवक ६००० क्विंटल झाली आहे. बाजारात सोयाबीनची आवक वाढली असुन सरासरी कमी दर शेतकऱ्यांच्या सोयाबीनला मिळत आहे.