new-img

फवारणीतून विद्राव्य खते देण्याचे फायदेच फायदे #agricola #farming #शेतकरी

फवारणीतून विद्राव्य खते देण्याचे अनेक फायदे आहेत ते तुम्हाला माहितीय का? 

https://youtube.com/shorts/4sUVRWOA7dY

पिकांची उत्पादन प्रक्रिया वाढविण्याकरिता फवारणी केली असता पिकांच्या उत्पादनात वाढ होते. जमिनीतील पाण्याची कमतरता किंवा कडक उन्हाळा परिस्थिती असल्यास फवारणीद्वारे सायंकाळी खते दिल्यास पिकांची पाने टवटवीत होऊन कार्यरत राहतात. कीड आणि रोगांचा प्रादुर्भावमुळे पाने कुरतडली जातात व खाल्ली जातात. पानाची जाळी होती अशावेळी फवारणीतून खते दिली असता नवीन पालवी फुटून पिके कार्यरत होऊ शकतात.अचानक निर्माण झालेल्या पानातील पोषण द्रव्यांची कमतरता भरून काढण्याचे काम हे खते करतात. पीक फुलोऱ्यात असताना, मोहोर येण्याच्या वेळी किंवा फलधारणा त्यानंतर फळांची वाढ होत असताना जेव्हा अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात लागतात अशावेळी फवारणीद्वारे दिलेली विद्राव्य खते फार उपयोगी पडतात उत्पादनामध्ये वाढ होते.